अरिहंत शिक्षण संस्थेच्या, अरिहंत कला , वाणिज्य आणि विज्ञान  महाविद्यालय , कॅम्प , पुणे येथे दिनांक ३ जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती संस्थेचे शैक्षणिक संचालक डॉ. भूषण पाटील आणि प्राचार्य डॉ.  मुकुंद डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली साजरी करण्यात आली . सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या कार्यावर आधारित या चर्च्यासत्रात शिक्षक त्याचबरोबर शिक्षतेवर कर्मचारी वर्गाचा सहभाग उल्लेखनीय होता . कार्यक्रमामध्ये सहाय्यक प्राध्यापक ज्योती  येंगुपतला  , सोनल कनसल , गौतम शिंदे , कांचन शिंदे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील अनुभव , प्रसंग त्याचबरोबर त्यांच्या  कार्यप्रणाली चा परिचय सर्वाना करून दिला .

कार्यक्रमाचे आयोजन देवयानी पाटील यांनी केले व कार्यक्रमाचे सूत्र संचालन अंकिता बनकर यांनी केले ||