जागतिक मानवी हक्क दिन – १0 डिसेंबर, २०२०
दिनांक १0 डिसेंबर, २०२० रोजी अरिहंत एज्युकेशन फाऊंडेशनचे, अरिहंत कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, कॅम्प – पुणे, येथे संस्थेचे संचालक डॉ. संजय मालपाणी, व्यवस्थापकीय संचालक डॉ. भूषण पाटील आणि विभागीय संचालक चेतन पारिख यांच्या प्रेरणेने कला मंडळ विभाग द्वारे ‘जागतिक मानवी हक्क दिन’ ऑनलाइन/ऑफलाइन स्वरुपात साजरा करण्यात आला. कोविड १९ च्या सर्व नियमावलींचे पालन करून महाविद्यालयात ऑनलाइन व्याख्यान आणि ऑनलाइन/ऑफलाइन स्वरुपात खुले चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. सदर कार्यक्रमात संस्थेचे व्यवथापकीय संचालक डॉ. भूषण पाटील, प्रभारी प्राचार्या डॉ. कांचन शिंदे आणि महाविद्यालयतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजन प्रा. सचिन म्हसवडे आणि प्रा. निलेश गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून ऑनलाइन स्वरुपात (platform-Google meet) डॉ.मोरेश्वर नेरकर (झुलाल भिलाजीराव पाटिल महाविद्यालय, धुळे) उपस्थित होते. डॉ. मोरेश्वर नेरकर यांनी ‘मानवी हक्क संकल्पना आणि सद्यस्थिति’ या विषयावर व्याख्यान दिले. आजच्या काळात समाजात मानवी अधिकाराची कशाप्रकारे गळचेपी होत आहे त्याचबरोबर यावर कशाप्रकारे उपाय योजना करता येतील या संदर्भांत त्यांनी अनेक उदाहरणे देऊन स्पष्टीकरण दिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सचिन म्हसवडे यांनी केले. आणि उपस्थितांचे आभार डॉ.राधारानी बॅनर्जी यांनी मानले. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांनी खुल्या चर्चासत्रात सक्रिय सहभाग नोंदविला. यावेळी अनेक प्राध्यापकांनी मानवाधिकार आणि मूलभूत हक्क या विषयावर आपले विचार व्यक्त करून कार्यक्रमाची प्रतिष्ठा वाढवली.