दिनांक  ९ मार्च, २०२१ रोजी अरिहंत एज्युकेशन फाऊंडेशनचे, अरिहंत कॉलेज ऑफ आर्ट्स , कॉमर्स

अँड सायन्स, कॅम्प – पुणे, येथे संस्थेचे संचालक श्री. संजय मालपाणी आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ.

भुषण पाटील यांच्या प्रेरणेने महाविद्यालयात कला मंडळ विभागाद्वारे आंतरराष्ट्रीय महिला दिना-निमित्त

कोविड १९ च्या सर्व नियमावलींचे पालन करून “ती….. आणि वरंच काही” या विषयावर खुले चर्चासत्र

आयोजित करण्यात आले. सदर कार्यक्रमास संस्थेचे व्यवथापकीय संचालक डॉ. भुषण पाटील

आणि प्रभारी प्राचार्या डॉ. कांचन शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमास महाविद्यालयतील सर्व शिक्षक व

शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन कार्यक्रम समन्वयक प्रा. कुमुदिनी पवार यांनी केले.

डॉ. भुषण पाटील सरांनी स्त्री-पुरुष समानता या विषयावर बोलत असताना आजच्या धावपळीच्या

जीवनामध्ये स्त्रियांच्या अधिकाराचा विचार करणे आणि त्यांना सहकार्य करणे गरजेचे आहे असे आवाहन उपस्थित

सर्व सहकार्यांना केले. डॉ. भुषण पाटील सरांनी सर्व महिला कर्मचाऱ्यांना आंतरराष्ट्रीय महिला

दिनाच्या शुभेच्छा दिल्या. प्रा. गौतम शिंदे सरांनी “स्त्रियांची बदलती रूपे” या विषयावर आपले मनोगत मांडले. या

कार्यक्रमाच्या निमित्ताने स्त्रियांच्या जीवनावर आधारित काव्य स्वरूपामध्ये एक चित्रफित दाखवून त्यावर

चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. या चर्चासत्रात दीपक आंबोरे यांनी स्त्री जीवनावर आधारित काव्य सादर

केले. प्रा. मंगेश तापकीरे, प्रा. लक्ष्मण क्षीरसागर प्रा. सोनल कन्सल, प्रा. मृदुला जाधव, प्रा. आरती कोठावडे, प्रा.

प्रणाली देशमुख, प्रा. प्रभा बटवाल, प्रा. पुष्पलता वायदंडे या सर्वांनी उत्सुफूर्तपणे आपले विचार व्यक्त करून

कार्यक्रमाची शोभा वाढवली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. कुमुदिनी पवार यांनी केले. आणि उपस्थितांचे आभार प्रा. प्रिया तळवार यांनी मानले.