विद्ये विना मती गेली।

मती विना नीती गेली॥

नीती विना गती गेली।

गती विना वित्त गेले।।

वित्त विना शुद्र खचले।

एवढे अनर्थ एका अविद्येने केले॥

शिक्षणाविषयीची तळागाळातील लोकांची ही जी जाणीव आहे ती  त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तळमळीने कार्य करणारे भारताचे पहिले समाज क्रांतिकारक, शूद्रांना संघटित करणारे, अस्पृश्यांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देणारे, बहुजनांच्या कार्यासाठी तळमळीने सर्व आयुष्य वेचणारे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्त्रियांना ती एक माणूस आहे ती एक व्यक्ती आहे आणि माणूस म्हणून जगण्याचा तिला हक्क आहे याची जाणीव करून देणारे, खरंतर शब्द अपुरे पडतील इतके विविध पैलू आहेत असे क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १३० व्या पुण्यतिथीनिमित्त दिनांक २८/११/२०२०  रोजी कला मंडळ अंतर्गत महात्मा फुले – विचारधाराया कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या दिवशी डॉ.राधाराणी  बॅनर्जी यांनी महिला सबलीकरण, भूषण बिरादार यांनी जातिव्यवस्था तसेच आरती कोठावदे यांनी शिक्षण या विषयावर व्याख्यान दिले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार प्रकट केले. यानंतर महात्मा फुले-विचारधारा या विषयावर चर्चासत्र झाले. विविध विषयांच्या प्राध्यापकांनी चर्चासत्रामध्ये सहभाग घेतला. डॉ. भुषण पाटील, व्यवस्थापकीय संचालक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रीती केदारी यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. शितल अंकुशे (ग्रंथपाल), यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये सहकार्य केले. देवयानी पाटील यांनी कार्यक्रमाचेआभार प्रदर्शन केले.