राष्ट्रीय युवा दिन अहवाल

अरिहंत एज्युकेशन फाउंडेशनचे अरिहंत कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय  कॅम्प व बावधन यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन पध्दतीने राष्ट्रीय युवा दिन साजरा

केवळ भारतातच नव्हे तर सगळ्या जगाला धर्माचा खरा अर्थ आणि वेदांताचा मार्ग दाखवणाऱ्या स्वामी विवेकानंद यांचा  १२ जानेवारी हा जन्मदिवस संपूर्ण भारतात ‘ राष्ट्रीय युवा दिन ‘ म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून कॅम्प व बावधान महाविद्यालयामध्ये ऑनलाईन पद्धतीने Youth Power या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले.

अरिहंत एज्युकेशन फाउंडेशनचे अध्यक्ष मा. संजयजी मालपाणी  ,संस्थेचे संचालक मा. यशजी मालपाणी ,मा. व्यवस्थापकीय संचालक डॉ. भूषण पाटील, प्राचार्य मा. डॉ.वडजे व डॉ. कांचन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली  कॅम्प व बावधान महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण  विभाग प्रमुख डॉ. गौतम शिंदे व प्रा. अण्णा मोहिते यांनी या व्याख्यानाचे आयोजन केले होते .

राष्ट्रीय युवा दिनानिमित्त आयोजित या व्याख्यानाचे प्रमुख मानबिंदू, व्याख्याते मा. डॉ. अरुण शिंदे यांनी अत्यंत प्रभावीपणे संघर्षमय जीवनाला सामोरे कसे जावे, विचार , भावना, कृती या गोष्टी जीवनात किती महत्त्वाच्या असतात हे सांगताना दैनंदिन जीवनातील वेगवेगळी उदाहरणे देऊन मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच उत्साहपूर्ण वातावरण निर्मिती केली. 

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रणाली देशमुख, प्रास्ताविक प्रा.अण्णा मोहिते, व्याख्यातांचा परिचय डॉ. गौतम शिंदे, तांत्रिक मदत प्रा.मृदुला जाधव आणि आभारप्रदर्शन प्रा.दुर्गा दगडे यांनी केले. तसेच कॅम्प व बावधान महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य केले. 

या कार्यक्रमासाठी कॅम्प व बावधान महाविद्यालयातील सर्व शाखेतील प्राध्यापक ,प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.