अश्रू भरीत डोळ्यांनी विद्यार्थ्यांनी घेतला कान्हे गाव चा निरोप

तळेगाव. दिनांक २४ येथील कान्हे ता.मावळ येथे  अरिहंत कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय पुणे व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या सात दिवसीय निवासी शिबीराचा निरोप समारंभ पार पडला . याप्रसंगी व्यासपीठावर गावचे सरपंच विजय सातकर, गावचे पोलीस पाटील शांताराम सातकर, साईबाबाधामचे व्यवस्थापक दत्तात्रय चांदगुडे , अध्यापक महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. संदीप गाडेकर, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यकारी अधिकारी रमजान वारूनकर, भूषण बिरादार, अरिहंत महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ.लक्ष्मण शिरसागर, शितल अंकुशे इत्यादी मान्यवर उपस्थित  होते. या सात   दिवसांमध्ये 75 विद्यार्थ्यांनी गावांमध्ये विविध प्रकारचे सामाजिक कार्य पूर्ण केले, जसे की गावाजवळील ओढ्यावर कोल्हापुरी बंधारा बांधणे, स्मशानभूमीची स्वच्छता करणे, प्लास्टिक कचरा मुक्ती अभियान राबवणे, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम राबवणे, त्यांना खेळाचे मैदान तयार करून देणे, गावकऱ्यांमध्ये स्त्री शिक्षणाचे महत्व पटवून देऊन स्त्री सबलीकरणासाठी  प्रयत्न करणे यासारखे अनेक कार्य विद्यार्थ्यांनी श्रमदानातून पार पाडले. याप्रसंगी विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजयजी मालपाणी, संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. नरेंद्रजी कडू, . शैक्षणिक व्यवस्थापक डॉ. भूषणजी पाटील,विभागीय व्यवस्थापक चेतनजी पारीख महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मुकुंदजी डोंगरे इत्यादी मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले.