अरिहंत महाविद्यालयात “रिसेन्ट ट्रेंड्स इन  इन्फॉर्मशन टेकनॉलॉजि” या विषयावर नॅशनल वेबिनार

अरिहंत शिक्षण संस्थेच्या अरिहंत कला ,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय येथील संगणक विभागाने आयोजित केलेल्या

सप्टेंबर ते सप्टेंबर, 2020 या तीन दिवसीय नॅशनल वेबिनार मध्ये विविध विषयांवर व्याख्याने आयोजित केली गेली होती. पहिल्या दिवशी अनंतराव थोपटे महाविद्यालयातील प्राध्यापिका दीपाली जाधव यांनी AngularJs या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले नंतर दुसऱ्या दिवशी अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेज ऑफ सायन्स अँड मॅनेजमेंटच्या प्राध्यापिका वर्षा गीधे यांनी Bigdata या विषयावर विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन केले तिसऱ्या दिवशी अनगप्‍पा कॉलेज तमिळनाडू येथून प्राध्यापिका के. कौसल्या यांनी Hadoop या विषयावर विद्यार्थ्यांना व्याख्यान दिले.

कार्यक्रमांमध्ये साडेचारशे च्या संख्येने कनिष्ठ महाविद्यालयातील त्याच बरोबर इतर महाविद्यालयातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शवली. शैक्षणिक संचालक डॉ.भुषण पाटील आणि प्राचार्य डॉ. पी. आर. वडजे यांचे प्रोत्साहन आणि संगणक विभाग प्रमुख प्रा. संग्राम काकडे व IQAC विभाग प्रमुख प्रा. रूपाली मेमाने यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. अंकिता बनकर, प्रा. मृदुला जाधव आणि प्रा. प्रणाली देशमुख यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. कला विभागातील विद्यार्थ्यांनी कु. प्रकृती मिश्रा हिने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.