अरिहंत शिक्षण संस्थेच्या, अरिहंत कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, कॅम्प, पुणे येथे दिनांक 5 सप्टेंबर रोजी “शिक्षक दिन”साजरा करण्यात आला.
“नवीन शैक्षणिक धोरण” हा कार्यक्रमाचा विषय असून कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून अरिहंत कॉलेज ऑफ एज्युकेशनच्या प्राचार्या डॉ. सुजाता आडमुठे ,शैक्षणिक संचालक डॉ. भुषण पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. वडजे सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. भुषण पाटील यांनी केले. नवीन शैक्षणिक धोरण या विषयावर डॉ. सुजाता आडमुठे यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्गांनी उपस्थिती दर्शवली. शैक्षणिक संचालक डॉ. भुषण पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. अंकिता बनकर , प्रा. मृदुला जाधव, डॉ. कांचन शिंदे , प्रा. देवयानी पाटील आणि डॉ. गौतम शिंदे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. प्रा. प्रणाली देशमुख यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले . आणि प्रा. आरती कोठावदे यांनी आभार प्रदर्शन व्यक्त केले