दिनांक २० फेब्रुवारी, २०२१रोजी अरिहंत एज्युकेशन फाऊंडेशनचे, अरिहंत कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँन्ड सायन्स, कॅम्प – पुणे, येथे संस्थेचे संचालक श्री. संजय मालपाणी आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. भुषण पाटील , विभागीय संचालक चेतन पारिख यांच्या प्रेरणेने महाविद्यालयात कला मंडळ विभागाद्वारे ‘शिवजयंती’साजरी करण्यात आली.कोविड१९ च्या सर्व नियमावलींचे पालन करून महाविद्यालयात व्याख्यान आणि खुले चर्चासत्र आयोजित करण्यात आले. सदर कार्यक्रमात संस्थेचे व्यवथापकीय संचालक डॉ. भुषण पाटील आणि प्रभारी प्राचार्या डॉ. कांचन शिंदे हे उपस्थित होते. त्याचबरोबर महाविद्यालयतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन प्रा. प्रिया तळवार यांनी केले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून प्रा. भूषण बिरादार आणि प्रा. निलेश गायकवाड उपस्थित होते. प्रा. भूषण बिरादार यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यवस्थापन ‘ याविषयावर आणिप्रा. निलेश गायकवाडयांनी ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे स्त्री विषयक विचार’ या विषयावर व्याख्यान दिले. प्रा. भूषण बिरादार यांनी शिवाजी महाराजांचे व्यवस्थापन किती अचूक होते, त्या व्यवस्थापनाच्या जोरावर त्यांनी कशाप्रकारे विजय मिळवला आणि त्याच व्यवस्थापनाचे धडे नवीन पिढीने घेतले पाहिजेत, याबद्दल अनेक उदाहरणे देऊन स्पष्टीकरण दिले आणि प्रा. निलेश गायकवाड यांनी त्यांचे स्त्रीविषयक विचार किती पुढारलेले होते याबद्दल माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. प्रिया तळवार यांनी केले. आणि उपस्थितांचे आभार प्रा. कुमुदिनी पवार यांनी मानले. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांनी कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदविला. कार्यक्रमात झालेल्या चर्चासत्रात सर्वांनी उत्सुफूर्तपणे आपले विचार व्यक्त करून कार्यक्रमाची प्रतिष्ठा वाढवली.