सावित्रीबाई फुले जयंती

दिनांक ४ जानेवारी 0 रोजी  सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली.आद्य शिक्षिका, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे कार्य प्रेरणादायी व क्रांतिकारी आहे. सावित्रीबाईंचा निस्सीम त्याग व धैर्यामुळे आजच्या महिलेला समाजात मानाचे व प्रतिष्ठेचे स्थान प्राप्त झाले आहे.

सावित्रीबाईंचे प्रगतशील व शिक्षित समाज घडविण्याचे कार्य पुढे नेणे हीच काळाची गरज असल्याचे प्रतिपादन अरिहंत शिक्षण संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.भुषण पाटील यांनी केले. आपल्या मार्गदर्शनात त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले व  सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचे महत्व ओळखून समाज शिक्षित करण्याकरिता केलेल्या महान कार्याचे महत्व विशद केले.प्रीती शेलार यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित काव्य ओळी सादर केल्या. त्यानंतर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ.कांचन शिंदे त्याचबरोबर डॉ.गौतम शिंदे, भूषण बिरादार, रमजान वारूनकर, सोनल कनसल, मृदुला जाधव उपस्थित सर्वांनी चर्चासत्रास उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकिता बनकर यांनी केले.