१४ नोव्हेंबर हा पंडित जवाहरलाल नेहरु यांचा जन्मदिन खऱ्या अर्थाने बाल दिन म्हणून संपूर्ण देशात साजरा केला जातो.मुलं काय शिकतात यापेक्षा त्यांच्यावर कोणते संस्कार होतात ही खरी जबाबदारी पालक व शिक्षकांची असते. मुलांना घडवण्यामध्ये शिक्षकांचा देखील फार मोठा वाटा असतो.अरिहंत कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने 1 डिसेंबर 2020 या दिवशी हा जागतिक बाल दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये तीन वेगवेगळ्या लघु चित्रफिती दाखविण्यात आल्या व यावर चर्चासत्र घडविण्यात आले. उद्या जर सुजाण नागरिक घडवायचे असतील तर आज मुलांना प्रत्येक गोष्टीची जाणीव करून देणे फार गरजेचे आहे. पालकांनी अथवा शिक्षकांनी मुलांना या गोष्टींची सवय लावली पाहिजे. त्यासाठी मुलांना स्वकष्टाची सवय व परिस्थितीची जाणीव असणे गरजेचे आहे असे एक छोटे चर्चासत्र या दिवशी या कार्यक्रमा मध्ये घडविण्यात आले. उपस्थित सर्व प्राध्यापकांनी या चर्चासत्रांमध्ये सहभाग घेतला डॉ. भुषण पाटील, व्यवस्थापकीय संचालक यांच्या मार्गदर्शनाखाली देवयानी पाटील यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले. महाविद्यालयाच्या कला मंडळ विभागाच्या प्रमुख अंकिता बनकर यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये सहकार्य केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन असमा पटेल यांनी केले.