अरिहंत शिक्षण संस्थेच्या अरिहंत कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या संगणक विभागाने तीन दिवसीय इंटरनॅशनल वेबिनार दिनांक 11 ते 13 सप्टेंबर 2020 या दिवशी आयोजित केला. या तीन दिवसीय इंटरनॅशनल वेबिनार मध्ये विविध विषयांवर व्याख्याने आयोजित करण्यात आली. इंटरनॅशनल वेबिनार च्या पहिल्या दिवशी इनबॉक्स रोबोटिक्स या कंपनीमधील रोबोटिक स्पेशालिस्ट मि. साकेत परदेशी यांनी रोबोटिक्स या विषयावर , एबिज टेक्नॉलॉजी, दुबई येथील मनोज जोसेफ यांनी ब्लॉकचेन , तसेच तिसऱ्या दिवशी कॉस्को होलसेल येथील प्रीती यादव यांनी अजुर बेसिक्स या विषयावर विद्यार्थ्यांना तसेच विविध कॉलेजमधील शिक्षकांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमांमध्ये साधारण साडेतीनशे शिक्षक व विद्यार्थी यांचा सहभाग होता.शैक्षणिक संचालक डॉ. भुषण पाटील व प्राचार्य डॉ. पी आर वडजे यांचे प्रोत्साहन आणि संगणक विभाग प्रमुख प्रा.संग्राम काकडे व lQAC कोऑर्डिनेटर प्रा. रूपाली मेमाने यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. प्रणाली देशमुख यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. त्याच प्रमाणे, प्रा. मृदुला जाधव आणि प्रा. अंकिता बनकर, प्रा. प्रीती केदारी, प्रा. रुमा धनवटे, प्रा. प्रिया तलावर, प्रा. सोफिन सय्यद प्रा. अस्मा पटेल यांनी सहकार्य केले. कला विभागातील विद्यार्थिनी कु. प्रकृती मिश्रा हिने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तसेच टेक्निकल सपोर्ट साठी कॉम्प्युटर सायन्स मधील अभिषेक भन्साळी, संजना गोडसे, कनिष्क खोले या विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.