२७ फेब्रुवारी, ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कविवर्य विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. अरिहंत एज्युकेशन फाउंडेशनचे अरिहंत कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, कॅम्प, पुणे येथे मानविकी विद्याशाखेद्वारा ‘मराठी भाषा गौरव’ दिनानिमित्त अरिहतं एज्युके शन फाउंडेशन चे संस्थापक मा. संजय मालपाणी , संचालक मा. यश मालपाणी, व्यवस्थापकीय संचालक डॉ.भूषण पाटील, प्रभारी प्राचार्या डॉ. कांचन शिदे यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाईन पध्दतीने ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा करण्यात आला.
प्रमुख वक्ते डॉ. महेश रणदिवे यांनी विद्यार्थ्यांना ‘मराठी भाषा संवर्धन : काळाची गरज’ या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले. व्यवस्थापकीय संचालक डॉ.भूषण पाटील यांनी मराठी विद्यार्थ्यांना मराठी भाषेचे कशा प्रकारे संवर्धन केले गेले पाहिजे याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक डॉ.लक्ष्मण क्षिरसागर यांनी केले. महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवून कार्यक्रमाची शोभा वाढवली .महाविद्यालयातील विद्यार्थी चंद्रसेन जाधव याने
“लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी।
जाहलो खरेच धन्य, ऐकतो मराठी ।।
मी मराठी…….मी मराठी….”
या कवितेच्या ओळी प्रस्तुत करुन कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.